माढासोलापूर जिल्हा

कव्हे येथील चोपडे यांची महाराष्ट्र मराठी चित्रपट अर्थसहाय्य व परीक्षण समितीवर निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कव्हे येथील चोपडे यांची महाराष्ट्र मराठी चित्रपट अर्थसहाय्य व परीक्षण समितीवर निवड

करमाळा(प्रतिनिधी); सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व विलासराव देशमुख विचार मंच चे अध्यक्ष कव्हे गावचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे समर्थक अशोक चोपडे यांची महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार अमित विलासरावजी देशमुख यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र मराठी चित्रपट अर्थ साहाय्य व परीक्षण समिती वर निवड केली आहे.

त्याबद्दल अशोक चोपडे यांचा कव्हे ग्रामपंचायत व कव्हे येथील नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचा करमाळयाचे आमदार संजय शिंदे यांनी ही विशेष सन्मान केला.

श्री चोपडे यांनी चित्रपट अर्थसहाय्य व परीक्षेत समितीचा जास्तीत जास्त फायदा सोलापूर लातूर उस्मानाबाद बीड व पश्चिम महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त अर्थसाहाय्य करून या भागातील निर्माते दिग्दर्शक कलाकार व माढा व करमाळा भागांमध्ये सिनेमाचे चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले यावेळी कव्हे गावचे गटनेते माजी सरपंच बँक इंस्पेक्टर कैलास करंडे यांच्या हस्ते अशोक चोपडे यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – सात हजाराची लाच घेताना करमाळा पोलीस स्टेशनच्या ‘या’ पोलिसाला रंगेहात पकडले

कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार

सत्कार करते वेळी कव्हे गाव चे सरपंच शिरसागर उपसरपंच अविनाश करंडे तंटामुक्तीचे अध्यक्ष दगडू चोपडे अंकुश करंडे पेट्रोल पंपाचे मालक राजकुमार देशमुख माजी कृषी सहाय्यक अरुण माने संजय देशमुख महादेव नांदे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मदने साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here