करमाळाशैक्षणिक

राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी होणार ‘ या’ भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी होणार ‘ या’ भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

केतूर ( अभय माने ) ; भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून राजुरी (ता. करमाळा ) ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 3/1/2022 पासून 12/1/2022 पर्यंत महिलांसाठी विविध कौशल्यावर आधारित व्यवसायिक प्रशिक्षण व भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

मुलींना शिकवा, भेदाभेद हटवा, असं नुसतं सांगून जमायचं नाही ! शिक्षण देऊन शहाणं करायचं, दुसरा काही उपायच नाही!! “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी” या उक्तीस प्रत्यक्ष कृतीत उतरवून फुले दांम्पत्यांनी मुलींच्या व्यवसाय उपयोगी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

या विचारांवर आधारित आपल्या राजुरी गावातील व पंचक्रोशीतील महिलांसाठी व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्रम राजुरी ग्रामपंचायतिच्या वतीने 15 वा वित्त आयोगामधील महिला व बालविकास या विभागांमधून आयोजित करण्यात येणार आहेत.

यामध्ये शिवणकाम, मेहंदी क्लास, ब्युटी पार्लर याचे प्रशिक्षण करमाळा येथील निशिगंधा शेंडे मॅडम यांच्या संस्थेच्या वतीने दहा दिवस देण्यात येणार आहे . या प्रशिक्षणामुळे महिलांच्या कला गुणांना वाव मिळून त्यांना व्यावसायाच्या संधी प्राप्त होतील हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आजच्या धकाधकीच्या काळात स्वसंरक्षणासाठी मुलींनी व महिलांनी कराटे कला आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे. कराटे कलेतून मन, बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच स्वसंरक्षण होते.

ही कला अवगत करणे काळाची गरज बनली आहे त्यामुळे शाळेतील कॉलेजमधील मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.तसेच 12 तारखेला समारोपाच्या दिवशी महिलांसाठी आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टराकडून होणार आहे.

प्रशिक्षण घेतल्यानंतर शासकीय मान्यता असलेले प्रमाणपत्र महिलांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी या प्रमाणपत्राचा आपल्याला उपयोग होईल.

त्याकरिता पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिलांनी दहा दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे व ग्रामसेवक रामेश्वर गलांडे यांनी केले.

litsbros

Comment here