भोसरे गावात घाणीचे साम्राज्य; दोन महिन्यांपासून साठले कचऱ्याचे ढीग
प्रतिनिधी ; संपूर्ण देश स्वच्छतेकडे वाटचाल करीत असताना माढा तालुक्यातील ग्रामपंचायत भोसरे उपभागातील नागरिकांना मात्र मुलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्याचा प्रकार करत आहे.
ग्रामपंचायतला जास्त प्रमाणात टॅक्स उपभागातुन मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले नगर, सम्राट अशोक नगर, माऊली नगर, छत्रपती शाहू नगर, नमिता नगर, तुकाराम नगर, राऊत वस्ती, दत्त नगर या सर्व भागातील नागरिकांना रस्ते, पाणी, लाईट, गटारी या सुविधा उपलब्ध नाहीत.
या सर्व भागात कचऱ्याचे ढिग ठिकठिकाणी साठले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात डेंगू, मलेरिया साथी चे आजार पसरत आहेत. कचऱ्याची घंटा गाडी 2 महिन्यापासून येत नाही.
सर्वत्र कचरा साठला आहे. चांदणे वाड येथील 2 महिलांना डेंगू झाला आहे. परंडा चौक बस स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. शाळा, कॅलेज मधील विद्यार्थी, नागरिक याना नाहक त्रास सहन कराव लागत आहे.
याला जबाबदार भोसरे ग्रामपंचायत आहे. हे कचऱ्याचे ढिग लवकरात लवकर उचलणयाची मागणी निवेदन वंचित बहूजन आघाडी भोसरे ग़ामपंचायत शाखा अध्यक्ष अमोल हावळे यानी उपविभागीय दंड अधिकार, प्रांत कार्यालय माढा विभाग कुर्डूवाडी, संताजी पाटील साहेब, पंचायत समिती गटविकास अधिकार कार्यालय कुर्डूवाडी, ग्रामपंचायत भोसरे ग्रामविस्तार अधिकार याच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
Comment here