करमाळाशेती - व्यापार

करमाळा तालुक्यात गहू हरभरा पिकाच्या पेरण्या खोळंबल्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात गहू हरभरा पिकाच्या पेरण्या खोळंबल्या

केतूर (अभय माने) : पावसाळा संपताच हिवाळ्यास प्रारंभ होतो परंतु यावर्षी ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचा परिणाम थंडीवर झाला. गहू हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण तयार न झाल्याने या पेरण्या वरचेवर रखडल्याने बहुतांश ठिकाणी गहू हरभराच्या पिकांच्या पेरण्यांना मोठ्या प्रमाणावर ब्रेक बसला आहे.

करमाळा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळ जवळ 80 टक्के पेरण्या होतात व राहिलेल्या पेरण्या ऊस गाळपासाठी गेल्यानंतर शेत मोकळी झाल्यानंतर होतात परंतु यावर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती.

या सर्वांचा परिणाम गहू हरभरा पिकांच्या पेरण्यावर झाला व या पेरण्या अतिशय अल्प प्रमाणात झाल्या. कृषीकेंद्र चालकांनी गहू व हरभरा पिकांचे बियाणे विक्रीसाठी आणले होते परंतु ती मागणी नसल्याने तशीच पडून आहेत.

सध्या पुन्हा एकदा वातावरणात बदल होत असला तरी पूर्वीप्रमाणे थंडी पडेल का ? आणि पडली तरी या पेरण्या होतील का ? याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

एकुणच वातावरणातील बदलामुळे गव्हाच्या पेरण्या अल्पप्रमाणात झाल्याने यावर्षी गव्हाचे दर भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वसामान्यांना चपाती खायला मिळते का नाही ही शंकाच आहे.

litsbros

Comment here