ठरलं! आ.संजय मामा शिंदे म्हणतात “जिथं अजित दादा तिथं मी”

ठरलं! आ.संजय मामा शिंदे म्हणतात “जिथं अजित दादा तिथं मी”

(प्रतिनिधी); राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे अजित दादा पवार यांनी याच पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की अजितदादा पवार यांच्यासोबत कोण कोण आमदार गेले आहेत.

करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा विचार करता आमदार संजय मामा शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संबंध करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 

यावर बोलताना आ.संजय मामा शिंदे म्हणाले की, “जिथं अजित दादा तिथं मी” अशा प्रकारे आपण अजित दादा पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट संकेत संजय मामा शिंदे यांनी दिले आहेत.

karmalamadhanews24: