करमाळा भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समितीच्या वतीने योग शिबिर संपन्न

करमाळा भारतीय जनता पार्टी व पतंजली योग समितीच्या वतीने योग शिबिर संपन्न

करमाळा (प्रतिनिधी):  – भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका व पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 21 जून रोजी योग शिबिराचे आयोजन कन्या प्रशाला श्री देवीचा माळ रोड करमाळा येथे सकाळी सात ते आठ या वेळेत करण्यात आले होते , योगामुळे मानवी जीवनात शारीरिक ,मानसिक ,अध्यात्मिक बदल घडतात, शारीरिक दृष्ट्या नागरिकांनी दररोज योग करून आपले शिबिर जपावे, या शिबिरास पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी, आरकिले सर ,प्रवीण शहाणे सर ,माया भागवत मॅडम या योग शिक्षकांनी योग शिबिरास प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

या शिबिराचे आयोजन भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले.

या शिबिरासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ज्येष्ठ नेते राधेश्याम देवी, महेश परदेशी, अभिमन्यू माने सर, बाळासाहेब सूर्यवंशी, राजूकाका वाशिंबेकर ,प्रदीप वीर ,भारत आण्णा वांगडे, संग्रामसिंह परदेशी, सतीश काकडे ,महेश सूर्यपुजारी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, नितीन झिंझाडे, प्रवीण देवी, योगेश सुरवडे,चंद्रकांत राखुंडे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम, 

डॉ सुनिता दोशी, शहाणे मॅडम , महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा राजश्री खाडे, चंपावती कांबळे, भैय्या कुंभार,भिष्माचार्य चांदणे, प्रवीण बिनवडे, प्रदीप देवी, मस्तान कुरेशी, मनोज मुसळे, गणेश जाधव ,जयंत काळे पाटील, गजेंद्र घाडगे, कमलेश दळवी, शरद कोकीळ, भैय्या चिवटे, शिवकुमार चिवटे, प्रशांत चिवटे, शंभू मेरूकर, राजेश पाटील,व भारतीय जनता पार्टी आणि पतंजली योग समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योग शिबिरासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांचे आभार राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line