रावगाव येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

रावगाव येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील रावगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने चहा पोहे या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की सालाबाद प्रमाणे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने हे अन्नदानाचे कार्य आम्ही दरवर्षी करत असतो प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो.

 पांडुरंगाच्या या वारीमध्ये विविध जाती-धर्माची वारकरी ही वारी पंढरपूरला पोहोच करण्याचा कार्य करत असतात आणि या वारीमध्ये हे अन्नदान करून आम्ही समाजाचे उत्तर दायित्व म्हणून ही जबाबदारी आम्ही पार पडत आहोत.

 यावेळी रावगाव मा . ग्रामपंचायत सदस्या अविदा( ताई) कांबळे, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रवीण कांबळे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे प्रतिष्ठानच्या सचिवा शितल कांबळे, प्रल्हाद कांबळे, प्रियंका कांबळे, दिपाली कांबळे, मयूर ढावरे , प्रयाग कांबळे, ओंकार पवार, राजभाऊ पवार, विजय पवार , गणेश जाधव, प्रल्हाद कांबळे, मयूर लोंढे , प्रेरणा कांबळे, आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line