करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची मागणी; वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवण्याची मागणी; वाचा सविस्तर 

जेऊर (प्रतिनिधी);

गेल्या महिनाभरात करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात ट्रॅक्टर, दूचाकी, दागिने, रोख रक्कम अशा धाडसी चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी परिसरातील प्रमुख ठिकाण जिंती चौक, टाकळी चौक, पारेवाडी चौक, वाशिंबे , चौफूला, कोर्टी बस स्टँड, कुंभेज फाटा चौक येथे सीसीटीव्ही कँमेरे बसविण्याची मागणी परिसरातील नागरीकांन मधून होत आहे. 

मागील महिन्यात झालेल्या धाडसी चोर्यांचे प्रमाण व पोलिस प्रशासनाला चोरट्यांना पकडण्यात आलेले अपयश त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेले चोरटे पोलिसांना खुलेआम आव्हाहन देत आहेत.

 त्यामुळे या परिसरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवले तर अशा घटनांचा आळा घालण्यासाठी व पोलिस प्रशासनाला तपासात मदत करण्यासाठी सीसीटीव्ही कँमेरे फायदेशीर ठरणार आहेत. असे सोगाव ग्रामपंचायतीते मा.सरपंच विजय गोडगे यांनी सांगितले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line