करमाळा तालुका माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध; ‘हे’ आहेत नवे संचालक
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक पतसंस्थेची निवडणुक बिनविरोध पार पडली. अकरा संचालक सदस्यांना विरोधात उमेदवारी अर्ज न आल्याने विजयी घोषीत करण्यात आले.
या नुतन संचालक मंडळात सुहास गायकवाड, सुनीलकुमार जाधव, दत्तात्रय भागडे, कांतिलाल बदे, साहेबराव आरकीले, किरण परदेशी, ज्योती चव्हाण, मनिषा तनपुरे, नानासाहेब नीळ, पांडूरंग वाघमारे व श्रीकांत नलबे यांचा समावेश आहे.
या निवडीनंतर विजयी उमेदवारांचे महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज व संस्था सचिव मंगेश तर्कसे, प्राचार्य कापले, पतसंस्था माजी चेअरमन यशवंतराव लावंड, बाळे पतसंस्था संचालक नवनाथ मोहोळकर, संपतराव दिरंगे सर (वरकुटे), सुनील भांगे सर (कंदर) माजी मुख्याध्यापक बापू पवार, पतसंस्था उपाध्यक्ष रशीद पठाण, शिक्षक संघटना कार्यध्यक्ष मुकुंदराव साळुंके, माजी प्राचार्य संपतराव कोठावळे, माजी संचालक बाळासाहेब भिसे, पत्रकार आण्णासाहेब काळे, विनोद ढेरे,जगन्नाथ जाधव, शिवशंकर फुलारी, प्रवीण बिनवडे, पोपट शिंदे, मुख्याध्यापक गौतम सांगडे ,मुख्यध्यापक नीळ सर (गौंडरे), माजी चेअरमन किरण किरवे, प्रताप बरडे, रविंद्र सपकाळ (सालसे) प्राचार्य राजेंद्र कोकाटे , मुख्याध्यापक घाडगे सर (झरे), यादव सर (वाशिंबे) साखरे सर (राजुरी), संतोष नुस्ते सर (कविटगाव) गुळसाडी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर तसेच तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.