अक्षय भालेराव खून खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे : उत्तरेश्वर कांबळे

अक्षय भालेराव खुन खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे : उत्तरेश्वर कांबळे 

जेऊर (प्रतिनीधी):  नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील भीमसैनिक अक्षय भालेराव याची दि 1 जुन रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का काढली या कारणाने गावातील नऊ जातीयवादी गावगुंडांनी निर्घृण हत्या केली आहे.

हा खून खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भीमसैनिक अक्षय भालेराव याच्या कुटुंबीयांना शासनाने 50 लाख रूपयांची अर्थिक मदत करावी अक्षयचा भाऊ आकाश भालेराव याला शासकीय सेवेत नोकरी द्यावी 

या खुन खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी .

याचा तपास पारदर्शक व्हावा म्हणून नांदेड येथील नागरिक सुरक्षा आधिकारी आयपीएस योगेशकुमार यांच्याकडे देण्यात यावा तसेच भालेराव कुटुंबियांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावा आणि सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

karmalamadhanews24: