यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या डॉ.शुभांगी पोटे-केकान यांचा शेलगाव (वां) ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार संपन्न

यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या डॉ.शुभांगी पोटे-केकान यांचा शेलगाव (वां) ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार संपन्न

करमाळा (प्रतिनिधी); 

शेलगाव (वां) येथील डॉ. शुभांगी ओंकार पोटे (केकान) या नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेत देशात ५३० व्या रँकमध्ये उत्तीर्ण होऊन देदीप्यमान यश प्राप्त केल्याबद्दल शेलगाव (वां) ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 त्याचबरोबर जयप्रकाश बिले सर मा.जि.प.सदस्या कुसुमताई दराडे, सोसायटीच्या विद्यमान चेअरमन मनीषा ताई केकान, मा.सरपंच नवनाथ केकान, मा.संचालक धनंजय खाडे, मा.सरपंच बाळासाहेब बेरे, एच. बी.डांगे साहेब, विलास ठोकळ सर, महादेव पवार, किरण साळुंखे, 

प्रवीण घोगरे, विलास खाडे सर, शेलगाव चे सरपंच अमर (दादा) ठोंबरे, उपसरपंच वसंत (दादा) केकान, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय केकान, प्रवीण पवळ, भारत पोटे, भगवान पोळ, आबासाहेब चिंचकर, दौलत पवार, विठ्ठल मारकड, समाधान जाधव, अमित केकान, धनंजय काटे इत्यादी उपस्थित होते.               

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलिक केकान गुरुजी यांनी केले तर आभार महेंद्र लोंढे यांनी व्यक्त केले.

karmalamadhanews24: