डॉ.बापूजी साळुंखे यांची जयंती केम येथे उत्साहात साजरी

डॉ.बापूजी साळुंखे यांची जयंती केम येथे उत्साहात साजरी

केम (प्रतिनिधी संजय जाधव); श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. पी. डी. कोंडलकर सर यांनी केले. 

याप्रसंगी सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. कुंडलिक वाघमारे सर यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवन आणि शैक्षणिक कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. 

याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. तळेकर डी. एन. सर, पर्यवेक्षक श्री बापूराव सांगवे सर, श्रीम. प्रीती राऊत मॅडम, श्री. डी. ए. गावकरे सर तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. संतोष साळुंखे सर आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती. वृषाली पवार , राजाभाऊ केंगार उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line