पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे; वृक्षमित्र रामचंद्र मदने यांचे प्रतिपादन

पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे; वृक्षमित्र रामचंद्र मदने यांचे प्रतिपादन 

केत्तूर(अभय माने) : पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. नेताजी सुभाष विद्यालयातील वृक्षमित्र रामचंद्र मदने म्हणाले आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्याध्यापक दिलावर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर दोन (ता.करमाळा) येथे वृक्षारोपण करण्यात आले .

याप्रसंगी रामचंद्र मदने यांनी झाडाविषयी सविस्तर माहिती सांगितली त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक तरी झाड लावावे आणि त्याची जोपासना करून ते जगवावे यावेळी प्रशालेतील वरिष्ठ लिपिक किसनराव भिसे पर्यवेक्षक भीमराव बुरूटे सहशिक्षक लक्ष्मण महानवर व मारुती जाधव उपस्थित होते.विशेष म्हणजे मदने सरांनी संपूर्ण उन्हाळ्यात शाळेच्या परिसरातील झाडांची निगा राखली.

 

छायाचित्र- नेताजी सुभाष विद्यालयाच्या पटांगणात वृक्षारोपण करताना मान्यवर मंडळी

karmalamadhanews24: