करमाळ्यात भिमजयंतीनिमित्त अप्पर पोलीस अधिक्षक जाधव यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक

करमाळ्यात भिमजयंतीनिमित्त अप्पर पोलीस अधिक्षक जाधव यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक


 

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत महात्मा फूले यांची हि प्रतिमा मिरवणूकांत लावा नागेशजी कांबळे यांची सूचना

करमाळा (प्रतिनिधी): येथील पंचायत समिती हाॅल मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर करमाळा शहर तसेच तालूक्याच्या ग्रामीण भागातील जयंती मंडळे व पोलीस पाटील यांची बैठक करमाळा पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली.


शहरात सोलापूर पॅटर्न प्रमाणे यंदा पाच ते सहा मंडळे आपापला रथ मिरवणार आहेत त्या पार्श्वभूमीवर यावेळी DYSP विशाल हिरे, पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव,पोलीस निरीक्षक गूंजेगावकर यांनी जयंती मंडळांना सूचना दिल्या तसेच काही अडचणी असल्यास सूचवण्याचे आव्हान केले.


यावेळी शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक-नागेश दादा कांबळे यांनी उपस्थित जयंती मंडळांनी आपापल्या मिरवणूकांमध्ये डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी गूरू मानलेल्या महात्मा फूले यांची देखील प्रतिमा ठेवावी असे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव भोसले,पत्रकार प्रफुल्ल दामोदरे,देवा लोंढे,भिमराव कांबळे, तसेच ग्रामीण भागातील पदाधिका-यांनी विचार मांडले.


अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी हा जयंती महोत्सव अतिशय उत्साही वातावरणात तसेच जबाबदारीने पार पाडून आपण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनूयायी असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन केले.
यावेळी शहर व ग्रामीण भागातील जयंती मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन API जगदाळे यांनी केले.

karmalamadhanews24: