करमाळाराजकारण

केत्तुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर माजी सभापती बापूसाहेब पाटील यांचे एकहाती वर्चस्व; क्लिक करुन वाचा सविस्तर निकाल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केत्तुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर माजी सभापती बापूसाहेब पाटील यांचे एकहाती वर्चस्व; क्लिक करुन वाचा सविस्तर निकाल

केत्तूर (अभय माने) केतूर (ता.करमाळा) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित केत्तूर या संस्थेच्या संचालक मंडळाची (2021/22 ते 2025/26)पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणूकीत विरोधी गटाचा दारुण पराभव करत माजी सभापती बापूसाहेब पाटील गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे.

13 सदस्य संख्या असलेल्या या संस्थेत बापूसाहेब पाटील गटाचे 3 सदस्य बिनविरोध विजयी झाले होते तर उर्वरित 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली

5 डिसेंबर रोजी जि प प्रा शाळा केत्तूर नं 2 येथे मतदान झाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा. दिलीप तिजोरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा यांनी काम पाहिले.

या निवडणुकीत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब पाटील यांच्या गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले असून माजी सभापती बापूसाहेब पाटील गटाने सोसायटीवरील आपले वर्चस्व आबाधीत ठेवले आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

विजयी उमेदवार
पृथ्वीराज दत्तात्रेय कानतोडे, चंद्रशेखर सदाशिव कोकणे , मनोहर गोरख मिंड , तानाजी अंबादास ठोंबरे ,दादासाहेब दिगंबर येडे ,दिगंबर मल्हारी नाझरकर ,सुभाष भगवान राऊत , बापू मुरलीधर खाटमोडे , सचिन रावसाहेब जरांडे , सचिन विष्णू खराडे ,भारत राजाराम देवकर , मंगल अंकुष कोकणे ,राजश्री विलास राऊत

छायाचित्र : बापूसाहेब पाटील

litsbros

Comment here