केम येथील तालमीची दुरवस्था; लवकर दुरुस्तीची तरुणांची मागणी
केम(संजय जाधव) ;
करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामपंचायत शेजारील तालमीची दुरूस्ती करावी अशी मागणी पैलवान मदन तात्या तळेकर यांनी केम ग्रामपंचायतीकडे केली आहे.
कुस्ती हा एक महाराष्टामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळापैकि प्रसिद्ध खेळ आहे. अनेक दिग्गज पैलवान या मातीत घडले आहेत.
पंरूतु केम सारख्या मोठया गावात याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. या तालमीत केम व परिसरातील मुले कुस्ती शिकण्यासाठि येतात, पंरूतु कुस्ती जिथे खेळली जाते त्या तालमीची पडझड झाली आहे. मुलांना राहण्याची व्यवस्था नाही.
यासाठी वारंवार ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप मदन तात्या यांनी केला आहे. सुरूवातीला केम ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या वरची खोली मुलांसाठी दिली होती.
पंरूतु काही काळाने खोटे कारणे सांगून ग्रामपंचायतीने खोली खाली करायला सांगितली, आता सध्या कुस्ती शिकण्यासाठी येणारी मुले या पडक्या तालमीत थांबतात त्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी केम ग्रामपंचायतीने या तालमीची दुरुस्ती करावी अशी मागणी तळेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ ११ जिल्ह्यांना बसणार हवामान बदलाचा फटका
शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार होण्याची शक्यता; शिक्षणमंत्र्यांचे संकेत
Comment here