करमाळामहाराष्ट्रराजकारण

जिंती ते कात्रज रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करण्याची मागणी; खासदार, आमदार यांना निवेदने

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिंती ते कात्रज रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करण्याची मागणी; खासदार, आमदार यांना निवेदने

करमाळा (प्रतिनिधी); जिंती चौक ते जुने कात्रज रेल्वे स्टेशन रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक किरण कवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी कवडे यांनी निवेदनात म्हटले आहे की जिंती चौक, कात्रज गाव ते कात्रज रेल्वे स्टेशन हा रस्ता अतिशय खराब झाल्याने नागरीकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान अनेक वेळा या मार्गाची दूरुस्ती करण्यात आली परंतु हा परिसर उजनी जलाशया दरम्यान असल्याने पाणथळ जमिनी व दलदलीमुळे रस्ता खचण्याचे प्रमाण अधिक आहे.

वारंवार रस्त्याची दुरुस्ती केली तरी ऊसाच्या जड वाहतुकीमुळे रस्ता खचत आहे.परिणामी रस्त्यावर केलेला खर्च व्यर्थ जात आहे. त्यामुळे हा मार्ग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट करून विकसित करावा.

सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,तहसीलदार समीर माने,खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर,आमदार संजय शिंदे यांना देण्यात आल्या आहेत.

litsbros

Comment here