करमाळा

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

करमाळा (प्रतिनिधी) ; डॉ. आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले त्यानिमित्त जेऊर येथे संभाजी ब्रिगेड च्यावतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना नितिन खटके म्हणाले की,
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही” असे ते समाज बांधवांना सांगत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.

स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला.

१९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला.

दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकते, बालाजी गावडे, राकेश पाटिल, विनोद गरड आकाश साळवे अतुल निर्मळ , रनजीत कांबळे सुहास शिंदे ,शुभम कर्चे ,शुभम कोठावळे आजिनाथ माने , स्टेशन मास्तर सचिन सोळंकी, राजू पवळ, पांडुरंग घाडगे पिंटू जाधव हेमा शिंदे बाळासाहेब घाडगे अमित संचेती विलास पवळ, पंकज पवळ, निखिल पवळ, मयुर पवळ, जसपाल पवळ, शरद साळवे, योगेश एकमल्ले, अतुल जोगदंड, विठ्ठल चांगभले ,अक्षय रानगट ,अमोल मारकड इ उपस्थित होते.

litsbros

Comment here