करमाळा

ग्रामसुधार समितीच्या वतीने आज करमाळा येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामसुधार समितीच्या वतीने आज करमाळा येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा (प्रतिनिधी):  ग्रामसुधार समिती, करमाळा यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य पुणे सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सोलापूर बँकेच्या प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल तसेच इंडोनेशिया येथे बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान कॉन्फरन्ससाठी निवड होऊन यशस्वी दौरा केल्याबद्दल यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उद्या शनिवार,ता.26 सकाळी 11 वाजता यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या ‘सेवाभवन’ करमाळा येथे होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसुधार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे हे असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे सचिव डी.जी.पाखरे तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्था यांनी केले आहे.

litsbros

Comment here