करमाळाधार्मिक

करमाळा शहरात महेबुब सुबहानी उरूसा निमित्त मोफत अन्नदान; मुस्लिम बांधवासह महिलांची ही मोठ्या प्रमाणात हजेरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात महेबुब सुबहानी उरूसा निमित्त मोफत अन्नदान; मुस्लिम बांधवासह महिलांची ही मोठ्या प्रमाणात हजेरी


करमाळा (प्रतिनिधी); प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बगदाद शरीफ येथील मेहबूब सुबहानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ अर्थात ग्यारहवी शरीफ निमित्त करमाळा शहरात आज असंख्य मुस्लिम व हिंदू बांधवांच्या उपस्थित मध्ये करमाळा शहरातील जुन्या कोर्टाच्या आवारातील महेबूब सुबहानी दर्गाह मध्ये फुलांची चादर चढवून फातीहा चा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सुलेमानिया मशिदीचे धर्मगुरू मौलाना मुजाहिद यांनी फातीहा चा धार्मिक कार्यक्रम केला यावेळी दर्गाहला आलेल्या शहरातील मुस्लिम भाविका बरोबर महिलांनाही मोफत अन्नदान कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.

यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनीही हजेरी लावली होती महबूब सुभानी यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मोफत अन्नदान अर्थात लंगर खाना याचा मुस्लिम बांधवा बरोबर हिंदू बांधवांनी देखील लाभ घेतला.

एकंदर पाहता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात महेबूब सुबहानी यांचा संदल व उरुसाचा कार्यक्रम शांततेच्या वातावरणात साजरा केला.

सदरचा धार्मिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

litsbros

Comment here