आरोग्यकरमाळा

वातावरणातील बदलाने नागरिक बेजार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वातावरणातील बदलाने नागरिक बेजार

केतूर (अभय माने):  कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याचे ऊन तर कधी प्रचंड उकाडा तर कधी अवकाळी पाऊस तर कधी थंडी या विचित्र वातावरणातील बदलाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे नागरिक सर्दी, खोकला, तापाने हैराण होत आहेत.

करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून नागरिकांना दिलासा मिळत असताना सर्दी , ताप , खोकला यांचे रुग्ण वाढू लागले लागले आहेत. सर्दी ताप खोकला ही कोरोनाचीच लक्षणे आहेत त्यामुळे नागरिक संशयाने घाबरु लागले आहेत. ताप हा व्हायरल फ्लु असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वातावरण बदलामुळे थंडीचा उलट्या-जुलाब अशा तक्रारीचे रुग्ण रुग्णालयात वाढत आहेत. ताप किंवा खोकला आठवडाभर राहतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये निदान , प्रभावी उपचार आणि विश्रांती या त्रिसूत्रीचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

” ताप ,खोकला ,सर्दी , हागवन हे व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे रोग आहेत, त्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे , सोशल डिस्टन्स ठेवावा , मास्कचा वापर करावा तसेच दूषित पाणी पिऊ नये.
-डॉ.चंद्रकांत पाटील ,केतुर (करमाळा)

litsbros

Comment here