करमाळा तालुक्यात परतीच्या पावसाचे धूमशान; ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली चाळण
केत्तूर (अभय माने) : यावर्षी परतीच्या पावसाने अक्षरशः कहरच केला आहे. पाऊस काही जाता जाईना त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे लहान मोठे अपघातही होत आहेत.
करमाळा शहराची जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. मागील काही वर्षात झालेल्या पावसाच्या तुलनेत यावर्षी झालेल्या तडाखेबाज पावसाने रस्त्याची मात्र पुरती वाट लावली आहे. अगोदरच रस्ते होत नाहीत त्यात पावसाने या रस्त्यांना ग्रहण लावले आहे.
परतीच्या सतत होणाऱ्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे असणारे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत तर ओढे, नाले, बंधारे खवळले आहेत तर शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाल्याने पावसाने शेतकऱ्यांचे मात्र दिवाळेच काढले आहे.
Comment here