आरोग्यकरमाळा

सरपडोह ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना मेडीक्लोरचे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सरपडोह ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना मेडीक्लोरचे वाटप व विकास सेवा सोसायटी नूतन सेक्रेटरी यांचा सत्कार समारंभ संपन्न

करमाळा (प्रतिनिधी):  मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे पिण्याचे पाणी खराब झाले आहे त्यामुळे सरपडोह ग्रामपंचायत च्या वतीने गावातील सर्व कुटुंबांना मेडिक्लोर बाटलीचे वाटप करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सर्व विकास सेवा सोसायटीच्या सचिव पदी श्री अनिल माने यांचे नियुक्ती झाल्यामुळे सरपडोह

 ग्रामस्थांच्या वतीने सोसायटी चेअरमन श्री लक्ष्मण मारुती खराडे यांच्या हस्ते श्री अनिल माने साहेब यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ व नूतन सत्कारमूर्ती श्री अनिल माने यांचे स्वागत व ग्रामस्थांना मार्गदर्शन पर मनोगत श्री नाथराव रंदवे उपसरपंच यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना श्री अनिल माने यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व गावातील विकास सेवा सोसायटी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी व सर्व सभासदांना कर्ज वाटप करण्यात आपण प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले.


यावेळी सरपंच, उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सोसायटीचे चेअरमन ,सोसायटीचे सर्व सभासद, पोलीस पाटील, तंटामुक्तीअध्यक्ष, दूध संस्था चेअरमन, रेशन दुकानदार व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here