करमाळा शहर सुतार गल्लीत मोकाट गायचा उपद्रव; प्रशासनाचे दुर्लक्ष, लस देणारे डॉक्टर म्हणतात, ‘गायला दवाखान्यात आणा’
करमाळा(प्रतिनिधी) ; जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून सर्वत्र जनावराबद्दल दहशत निर्माण झाली आहे. अशातच करमाळा शहरांमध्ये मोकाट जनावरांचा मात्र सर्वत्र सुळसुळाट दिसून येत आहे. नागरिकांना स्त्रियांना, लहान मुलांना हा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये लंपी आजाराची दहशत सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे.
अशीच एक मोकाट गाय मागील तीन दिवसापासून सुतार गल्ली येथे कोणाचेही घरात घुसत आहे. मागील दोन दिवसापासून ती बलराज परदेशी यांच्या घरात व कारखान्यातून बसून आहे.
याबाबत बलराज परदेशी हे नगर परिषद करमाळा येथेही जाऊन आले. पण करमाळा नगरपालिकेकडे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
यात गायचे मालक कोण आहे? माहित नसल्यामुळे कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. लंपि आजाराची काळजी म्हणून परदेशी हे करमाळा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक गेले असता, ‘गायला दवाखान्यात घेऊन या’ असे अत्यंत बेजबाबदार उत्तर त्यांना देण्यात आले. जनावर असतात तेथे येऊन जागेवर उपचार होत नाही, असे सांगण्यात आले.
त्या गायीला आता उठता येत नाही. गायीचा मालक कोण आहे हेही माहित नाही.
तसे पाहिलास करमाळा शहरात अशा अनेक मोकाट गाई फिरताना दिसत आहेत. आणि त्यांच्यामध्ये हा रोग पसरला आहे. लंम्पी सदृश्य लक्षणेही दिसून येत आहेत. परिसरात लहान पोरं बाहेर खेळत असतात, त्यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच लम्पी रोगाचा प्रसार ही सर्वत्र होऊ शकतो.
तरी शहरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे. या मोकळ्यां जनावरांचा बंदोबस्त करावा व त्यांना लंपी लस टोचण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comment here