आरोग्यकरमाळाताज्या घडामोडी

जनावरांमधील लम्पी स्किनचा परिणाम; ग्रामीण भागात चिकन- मटणावर संक्रात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जनावरांमधील लम्पी स्किनचा परिणाम; ग्रामीण भागात चिकन- मटणावर संक्रात

केत्तूर (अभय माने): श्रावण व त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव संपल्यानंतर मांसाहार विक्रेत्यांना सुगीचे दिवस येतात परंतु,या विक्रेत्यांवर सध्या वाईट दिवस आले आहेत असेच म्हणावे लागेल.जनावरांमध्ये सध्या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे हा रोग दुभत्या जनावरांना होत आहे.

परंतु समाजात याबाबत समाजात रोज नवनवीन अफवा पसरत असल्याने त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत आहे तर चिकन व्यवसायरही होऊ लागल्याने मांसाहार खवय्यांनी चिकन तसेच मटणाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे ऐन हंगामात चिकन, मटणाचा धंदा मंदावला आहे.

लम्पीस्कीन आजाराबाबत पशुपालकामध्ये चिंता व भय आहे. जनावराप्रमाणेच कोंबड्या व इतर प्राण्यांनासुद्धा लम्पी स्कीन हा आजार होतो अशा प्रकारचे अफवा पसरविल्या जात आहेत परंतु, धोका नको व खबरदारी म्हणून बहुसंख्य नागरिकांनी चिकन व मटन खाणे सध्या तरी बंद केले आहे.

” कोणताही रोग आला तरी चिकनवर व्यवसायावर संक्रात येते यावेळी तसेच झाले आहे मात्र लम्पीस्कीन आणि चिकनचा काहीही संबंध नाही की केवळ अफवा आहे.त्यामुळे मांसाहार प्रेमींनी चिकनवर येथेच्छ ताव मारावा.त्यात धाबरण्यासारखे काही नाही.”

-नजीर शेख, चिकन विक्रेता, केत्तूर

” बॉयलर कोंबड्यांमध्ये लम्पीन्स्किन आजाराची लक्षणे अद्याप आढळली नाहीत. काही खोडसाळ व्यक्ती जाणून-बुजून अफवा पसरवीत आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. या आजाराची लक्षणे अद्यापही म्हशी, शेळ्या, मेंढ्या, ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये आढळली नाहीत नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये.

– डॉ. प्रवीण शिंदे, पशुधन विकास अधिकारी, करमाळा

litsbros

Comment here