हजारो रुपयांची तिकिटे फाडली तरी केम स्टेशनवर गाडी थांबेना; विद्यार्थी, व्यापाऱ्यांचे होत आहे नुकसान
गेल्या बारा वर्षांपासून मुंबई- हैदराबाद या सुपरफास्ट एक्स्प्रेस ला केम येथे थांबा मिळावा म्हणून केम ग्रामस्थांनी प्रयत्न केले प्रसंगी रेल रोको आंदोलन करण्यात आले तेव्हा या गाडीला १५आॅक्टोंबर २०१२ रोजी रेल्वे प्रशासनाने केमला थांबा मंजूर केला पंरूतु रेल्वे विभागाने कलेक्शनची अट घालून प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली हि अट पूर्ण करण्याचे आवाहन केम ग्रामस्थावर पडले.
या साठि केम गावातून लोक वर्गणी केली व हा कायम थांबा टिकवण्यासाठी या गाडीने कोणी जावो न जावो दररोज पुणे, मुंबई,४०तिकिटाचा कोटा पूर्ण केला हा कोटा लोकवर्गणीतून पूर्ण केला.
तेंव्हा हि गाडि कायम झाली पंरूतु कोरनाच्या काळात गाडया बंद झाल्या त्यानंतर कोरोना संपल्यावर हळूहळू गाडया पूर्व पदावर आल्या पंरूतु रेल्वे प्रशासनाने कोणीतीहि सूचना न देता या गाडिचा थांबा रद् केला त्यामुळे केमकराना आपली मेहनत व पैसा पाण्यात गेला असी भिती वाटू लागली आहे.
मुंबई हैदराबाद या गाडिस थांबा मिळण्यासाठी केमच्य प्रवासी संघटनेकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
अखेर १५आॅक्टोबर२०१२रोजी रेल्वे विभागाने या गाडिला थांबा दिला यामुळे केम व परिसरातील दहा खेडयातील प्रवाशांना पुणे, मुंबई ला जाण्यासाठी सोय झाली पुण्याचे काम करून केमला सायंकाळी मुक्काम ला येण्याची सोय झाली.
पंरूतु कोरोना रोग मात्र केम गावावर बसला कोरोनाच्य काळात या गाडया बंद झाल्या कोरोना संपल्यावर तब्बल दिड वर्षाने या गाडया हळूहळू पूर्वपदावर आल्या पंरूतु रेल्वे विभागाने कोणतेही सूचना न देता या गाडिचा थांबा रद् केला.
आणि मुंबई चेन्नई मेल हि सुपरफास्ट करून केमचा थांबा रद् केला आणी सोलापूर,पुणे ला जाण्याची गैरसोय झाली मुंबई चेन्नई मेल हि गाडि सकाळी सात वाजता येयची त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांची सोलापूर , कुर्डुवाडी ला जाण्याची सोय होती या गाडिने विद्यार्थी, नौकरदार, प्रवासी याना डेली अपडाऊन करण्याची सोय होती आता गाडि नसल्याने गोर गरीबांच्या मुली महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहल्या आहेत याला जबाबदार कोण असा सवाल पालकातून होत आहे.
केम गाव कुंकू वासाठि प्रसिद्ध आहे या गावाला पूर्वी थांबणाऱ्या चेन्नई मुंबई व हैदराबाद मुंबई या गाडया आता थांबत नसल्याने या व्यवसायाचा विकास खुंटला तसेच कुर्डुवाडी सोलापूर जाणारी सकाळी गाडि नसल्याने सोलापूर , कुर्डुवाडी बाशीं ला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे गोर गरीबांच्या मुली महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहल्या आहेत याला जबाबदार कोण ,
– विजय ओहोळ अध्यक्ष प्रवासी संघटना केम
मी कुर्डुवाडी येथे भिसे काॅलेजला प्राध्यापक आहे मी रेल्वे पासधारक असून मी १५वर्षापासून केम कुर्डुवाडी डेली अपडाऊन करीत आहे केम येथील सत्तर,ते ऐंशी विद्यार्थी, विद्यार्थीनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे आता त्याना गाडि नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी रेल्वे विभागाने सोलापूर ला जाणारी सकाळी कोणतेहि एक्स्प्रेस ला थांबा देऊन विदयार्थांचे शैक्षणिक नुकसान थांबावे,
प्रशांत सावंत सर केम ,)केम गाव कुंकवासाठी प्रसिद्ध आहे हैदराबाद मुंबई या गाडिला मिळालेला थांबा टिकवण्यासाठी लोकवर्गणीतून रोज ४०तिकिटे काढली आणी या गाडिचा थांबा कायम झाला यामुळे गावच्या विकासासाठी मदत झाली पंरूतु कोरोना केम गावावर बसला आणी कोरोनामुळे य चेन्नई मुंबई मेल बंद झाल्या आणी कोरोनासंपल्यावर या गाडया सुरू झाल्या पण रेल्वे विभागाने कोणतेही सूचना न देता या गाडयाचा केमचा थांबा रद्द केला त्यामुळे विद्यार्थी,प्रवासी व्यापारी यांची गैरसोय झाली.
– सिराज मोमीन माजी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष केम
Comment here