करमाळामाणुसकीशैक्षणिक

पाथुर्डी येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे झाले किर्तनातून प्रबोधन; कार्यक्रमाला होती करमाळा गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाथुर्डी येथे ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे झाले किर्तनातून प्रबोधन; कार्यक्रमाला होती करमाळा गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती

केम(संजय जाधव) ; दिनांक 4 /12 /2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथुर्डी येथे माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियानांतर्गत ‘माझी वसुंधरा ‘ या विषयी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या किर्तन सोहळ्याचे उद्घाटन पंचायत समिती करमाळा चे BDO माननीय मनोज राऊत साहेब यांनी केले. या वेळी पाथुर्डी गावच्या सरपंच भाग्यश्री मोटे, उपसरपंच पप्पू खरात, चेअरमन संतोष मोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांगदेव कानडे, माजी अध्यक्ष धनंजय मोटे, पत्रकार व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे, पाथुर्डी गावचे ग्रामसेवक महेश काळे भाऊसाहेब उपस्थित होते.

 

माननीय BDO साहेबांनी आपल्या उद्घाटनपर भाषणा मध्ये गावकऱ्यांनी एकोप्याने राहून आपल्या गावचा विकास साधावा असे आवाहन केले व गावच्या विकासात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे सांगून विद्यार्थ्यांनी ही चांगले शिक्षण घेऊन आपली परिस्थिती सुधारावी असे प्रतिपादन केले.

महेश काळे भाऊसाहेब यांनी वसुंधरा अभियाना विषयी माहिती सांगितली. माझी वसुंधरा याविषयी पाथुर्डी गावचे माजी विद्यार्थी ह भ प स्वप्नील हनुमंत शिंदे महाराज व त्यांच्या सहकार्यांनी कीर्तन उत्तम प्रकारे सादर केले.

यामध्ये हनुमंत भीमराव शिंदे, ज्योतिर्लिंग काळे, अंकुश काळे, शिवाजी देवकर, भीमराव शिंदे, नागनाथ कानडे, मारूती देवकर, भारत नाळे, सुरेश खरात, दादा खरात व मृदुंगाची साथ दिलीप बेडकुते ( वरकूटे ) यांनी केली.

त्याचप्रमाणे महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ह भ प स्वप्निल महाराज शिंदे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने माझी वसुंधरा याविषयी वेगवेगळे दाखले देऊन किर्तनातून प्रबोधन केले. विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक महेश कांबळे ऊपशिक्षीका कविता कांबळे, सुरेखा चौरे, डि,पी, चौगुले, अंगणवाडी ताई पुष्पा कोरे यानी परिश्रम घेतले.

केम परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

ओमिक्रॉनचा धसका ! ‘या’ जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

litsbros

Comment here