करमाळाकेमशेती - व्यापार

केम परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस; शेती पिकांचे प्रचंड नुकसान

केम(संजय जाधव) ;
करमाळा तालुक्यातील केम परिसरात शुक्रवारी रात्री जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळि पावसाने शेतकऱ्यांच्या पिंकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तरी शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांला मदत करावी असी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केम येथे शुक्रवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला करमाळा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे केम मंडल मध्ये ३६ मि.मी ईतका पाऊस झाला. याचा फटका कांदा, ज्वारी,केळी, द्राक्ष बागाना बसला आहे.

 

केम परिसरात या वर्षी ज्वारीची पिके पोटऱ्यात आली होती या वर्षी शेतकऱ्यांना साल चंदिचा माल होईल असी आशा होती पण निसर्गाच्या लहरीने नुकसान झाले आहे, कडबा भुईसपाट झाले आहेत, केळीची झाडे पडली आहेत अगोदरच केळिला भाव नाही. दलाल चार पाच रूपये दराने केळी मागत आहे केळिच्या बागेसाठि लाखो रूपये शेतकऱ्यांचा खर्च झाला आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे ते कळेनासे झाले आहे कांद्याचे पिकात पाणी साचले आहे अगोदरच कांदा चारसे,पाचसे,रूपये क्विंटल ने जात आहे आता तर पावसाने कांदा नासणार आहे.

त्यामुळे शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे त्याला काय करावे ते कळेना नुकतीच द्राक्ष बागेच्या छाटण्या झाली आहे द्राक्षचा बहार धरला आहे पावसाचे पाणी फुलोऱ्यात पडले आहे यामुळे द्राक्षावर दवण्या, करपा, कूज, जिरण्या या रोगाणा द्राक्ष बागा रोगाला बळि पडत आहे द्राक्ष बागायतदार दररोज फवारणी करत आहे दहा हजारा पर्यत औषध लागत आहे.

तसेच ऊसतोड कामगारचे कोपटयात पाणी शिरल्याने मजुराना अक्षरक्षा रात्रभर जागावे लागले आहे. त्यामुळे पावसाने अहाकार ऊडाला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट! व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकही धास्तावले

litsbros

Comment here