करमाळामाणुसकीशैक्षणिक

सामाजिक बांधिलकीतून शेलगाव वांगी शाळेस सायकली भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सामाजिक बांधिलकीतून शेलगाव वांगी शाळेस सायकली भेट

करमाळा (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थिनींना येण्या जाण्याच्या त्रासामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब, शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या सायकल बँक संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शेलगाव वांगी शाळेतील शिक्षकांनी गावकऱ्यांना आवाहन केल्याने शेलगाव वांगी येथील

 सामाजिक कार्यकर्ते महादेव पवार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रम्हदेव केकान यांनी शाळेतील विद्यार्थिनी साठी दोन सायकली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेस भेट दिल्या. तर डॉक्टर संदीप पाटील यांनी पाच सायकली देऊ केल्या आहेत. यावेळी सरपंच अमर ठोंबरे, उपसरपंच चंद्रकांत केकान, ठोकळ सर, तंटामुक्त अध्यक्ष वसंत केकान, पोलीस पाटील नवनाथ केकान, नागनाथ केकान व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 या उपक्रमाबद्दल अभिनंदनिय काम शेलगाव वांगी शाळेच्या शिक्षकांकडून होत असल्याबद्दल कौतुक करून सामाजिक दायित्वाचा वसा व वारसा असाच पुढे चालू ठेवून उत्तरोत्तर सामाजिक कार्य करण्याचे प्रोत्साहन करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख आजिनाथ तोरमल यांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले.


यावेळी मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, श्रीकृष्ण काळेल, कृष्णा आदलिंग, संतोष वाघमोडे, तात्यासाहेब जगताप, शंकर आदलिंग मीनाक्षी कात्रेला सुनीता जाधव व समस्त ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

litsbros

Comment here