करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
दत्तकलाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र
केत्तूर (अभय माने): आॕगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत केत्तूर-1 , (ता.करमाळा ) जि.सोलापूर येथील दत्तकला आयडियल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
वेदांत मारुती भोसले (गुण-224) व पवन सुभाष सामंत (गुण-188) अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत, सदर विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून परीक्षा दिली. पैकी वेदांत भोसले याची नवोदयसाठीही निवड झाली आहे.
त्यांना प्राचार्य विजय मारकड, सहशिक्षक गणेश जगदाळे, वर्गशिक्षिका अर्चना पवार, बी.जी.बुरुटे, केंद्रप्रमुख विकास काळे, मिना शहाने, आई सौ.लता भोसले, सौ.मृणाल सामंत तसेच संस्थापक प्राचार्य रामदास झोळ, प्रा.माया झोळ, संचालिका सौ.ताटे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comment here