करमाळारोजगारशैक्षणिक

उमरडच्या कन्येची फाॅरेस्ट ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उमरडच्या कन्येची फाॅरेस्ट ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

उमरड (प्रतिनिधी): उमरड (ता.करमाळा) येथील डी.जी.बदे यांची कन्या पुनम हिची राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या फाॅरेस्ट ऑफिसरपदी निवड झाली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे.

त्यात कु. बदे ही उत्तीर्ण झाली आहे. मुख्य परिक्षा व मुलाखतीमध्ये तीने यश मिळवले आहे. उमरड मधील या परिक्षेत पास होणारी पुनम ही पहिलीच मुलगी आहे.

तिचा ग्रामपंचायत उमरड व ग्रामस्थ उमरड यांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते वामनदादा बदे, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, गायकवाड भाऊसाहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे, उमरड चे विद्यमान सरपंच बापूराव चोरमले, माजी सरपंच संदीप मारकड, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, ज्येष्ठ नेते श्रीमान चौधरी, संतोष झांजुर्णे संतोष मंजुळे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros

Comment here