करमाळाताज्या घडामोडीराजकारण

करमाळा बंदला चांगला प्रतिसाद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा बंदला चांगला प्रतिसाद

करमाळा (प्रतिनिधी): दि. 25 बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित भारत बंद अंतर्गत करमाळा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून सकाळी निघालेल्या रॅली मध्ये मोठया प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला.

यावेळी रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. पुढे शहरातील प्रमुख मार्गाने जात अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार विजयकुमार जाधव आणि पोलीस प्रशासना मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन समारोप करण्यात आला.

सदर निवेदनत म्हटले आहे कि, देशामध्ये ज्या प्रकारॆ आरएसएस आणि भाजपच्या माध्यमातून ज्ञानव्यापीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अयोध्या नंतर मथुरेचा मुद्दा उचलण्यात आला आणि नंतर आरएसएस आणि भाजपच्या इशाऱ्यावरूनच नुपूर शर्मा ने मुहम्मद पैगंबर साहेब यांच्या बद्दल अपशब्द बोलून अवमान आणि बदनामी केली. त्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर उमटून देशाची बदनामी झाली. सध्या २०२२ चालू आहे आरएसएस आणि भाजपला वाटते कि २०२४ ची निवडणूक लांब नाही त्यामुळे त्याच्या तयारीसाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरन करण्याच्या कामाला लागले आहेत.

आणि त्यासाठी नुपूर शर्माला कामाला लावण्यात आले आहे. नुपूर शर्माने पार्टीच्या सांगण्यावरूनच वक्तव्य केले आहे. त्यामुळे सरकारने तिच्याविरुद्ध पार्टीतून निलंबित करण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. भाजपचे कार्यकर्ते आजही नुपूर शर्माचे समर्थन करताना दिसत आहेत. त्यामुळे देशात काही ठिकाणी दंगल आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण झाला. सदरचे कृत्य हे संविधान विरोधी असून राष्ट्रद्रोहाचा असल्याचे म्हणत नुपूर शर्मा वरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या आंदोलनाला काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, सुजय जगताप, उत्तरेश्वर सावंत, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष दस्तगिर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, राष्ट्रवादीचे गोवर्धन चवरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे भिमराव कांबळे सर, जमियत उलेमा ए हिंद चे सदर मौलाना मोहसीन शेख, छत्रपती क्रांती सेनेचे आर आर पाटील, बाबुराव पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे कय्युम शेख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे भीमराव कांबळे, जिगर ग्रुपचे अमर शेख, सोहेल पठाण, इरफान शेख, शाहिद पठाण, आरिफ तांबोळी, मोहिद्दीन बागवान, सलमान घोडके, मोहसीन घोडके, इम्रान कुरेशी, साहिल कुरेशी, फिरोज शेख, बंडू शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे कादिर शेख, मैनुद्दीन शेख, जावेद मणेरी, राष्ट्रीय भटक्या-विमुक्त मोर्चाचे दिनेश माने, विनोद हरिहर, विद्यार्थी मोर्चाचे प्रेमकुमार सरतापे, साजिद आत्तार यांच्यासह दीपक भोसले, मतीन आत्तार, शाहनवाज कुरेशी, शोएब कुरेशी, साजिद बागवान, मजनू शेख, बाबुराव जाधव, समीर शेख, धर्मा खरात, गोविंदा खरात, अन्वर शेख, शकूर शेख, मुस्ताक शेख सह विविध समविचारी पक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्यांतनी उपस्थित राहून पाठींबा दिला.

यावेळी मोहसीन शेख, भीमराव कांबळे सर, आर आर पाटील, कय्युम शेख, कादिर शेख, गौतम खरात यांनी आपले विचार मांडले.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा करमाळा युनिटच्या पधादिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

litsbros

Comment here