करमाळा

वाशिंबे परिसरात ऊसतोडणी कामगारांचे संसार उघड्यावर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे परिसरात ऊसतोडणी कामगारांचे संसार उघड्यावर


वाशिंबे (प्रतिनिधी):
थंडीची चाहूल लागली असतानाच हवामान विभागा कडून १डीसेंबर पासूनअवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार बुधवार ता. १ रात्री ९ वाजन्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन वाशिंबे परिसरात रात्रभर संततधार स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली.
त्यामुळे शेतातील कामाना ब्रेक लागला असुन ठीक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे.

ऊसतोडणी हंगाम चालू असल्याने ऊसतोड मजुरांना ऊसतोड करुन ट्रक ट्रॅक्टरच्या सह्हाय्याने शेतातून ऊसाची वाहतूक करताना तारांबळ उडाली तर अनेक ठिकाणी पावसामुळे ऊस तोडणी थांबविण्यात आली.
अचानक आलेल्या पावसामुळे मजूरांच्या राहण्याचा प्रश्न निर्मान झालाअसून अनेक ठिकाणी झोपड्यांमध्ये पाणी साचून राहीले. त्यामुळे भर पावसात मजूरांचे संसार उघड्यावर आले असुन स्वयपाक करण्यासाठी

जळन,अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तू पावसामुळे भिजल्या असुन चुलही पेटविने मुश्किल झाले असुन लहान मुले थंडीत कुकुडत आहेत.त्यामुळे कामगार हतबल झाले असुन गावातील शाळा,समाज मंदीर,चावडी अशी स्थळे ऊघडी करून देण्याची मागणी कामगारांना कडून होत आहे.अवकाळी पाऊस ज्वारी पिकाला फायदेशीर ठरणार असला तरी भाजीपाला,फळ पिकांसाठी
नुकसान असुन रोगराई वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकटाने शेतकरी जेरीस आला आहे.त्यात ऐन थंडीत पावसाने हजेरी लावल्याने आणखी धास्तावला आहे.

litsbros

Comment here