प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीजपूरवठा आठ तास करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – युवानेते शंभूराजे जगताप-संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीजपूरवठा आठ तास करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – युवानेते शंभूराजे जगताप-संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती 

केत्तूर (अभय माने):  गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने उजनी धरण जेमतेम 60 टक्के भरले होते. प्रशासनाला या पाण्याचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. गतवर्षी प्रशासनाने प्रथम प्राधान्य नागरिक व पशुधनास पिण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी त्यानंतर शेती व उदयोग धंदयासाठी असे नियोजन केले. सदर पाणी वापरासह यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनातून झालेल्या नैसर्गिक घटीतून उजनी धरणाच्या पाण्याची पातळी मागील 47 वर्षात वजा 60 % एवढे मायनस मध्ये (निचांक्कावर) पहिल्यांदाच गेले. 

 

त्यामुळे चालु वर्षाचा पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी टिकले पाहिजे या उद्देशाने प्रशासनाने उजनी धरण परिसरात 2 तासाची वीज कपात करून 8 तास असणारी वीज 6 तासावर आणली. या परिसरात ऊस व केळी सारखी पिके मोठ्या प्रमाणात आहेत या पिकांना पाणी भरपूर व वारंवार लागते. जुनच्या पहिल्या पंधरवड्यात या परिसरात चांगला पाऊस झाला पण सध्या दमदार पाऊस पडताना दिसत नाही.

 त्यामुळे पिकांना पाणी भरपूर पाणी देणे गरजेचे आहे. धरण पट्टयात चांगला पाऊस झालेला आहे त्यामूळे जरी धरण मायनस मध्ये (वजा 40 % वर) असले तरी, पाणी पातळीत वाढ झाली आहे. अजून आख्खा पावसाळा बाकी आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी भरपूर पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरण निश्चीतपणे पूर्णपणे भरून ओहोरफ्लो होईल यात शंका नाही. 

या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने या पट्टयातील केळी , ऊस व इतर खरिप पिकांचा विचार करून या परिसरातील 6 तासाचा वीज पुरवठा पूर्ववत 8 तास करून बळीराजाला दिलासा दयावा असे आवाहन जगताप गटाने युवा नेते तथा कृ.ऊ बाजार समिती चे संचालक शंभूराजे जगताप यांनी केले आहे .

karmalamadhanews24: