करमाळाराजकारण

उजनी मायनसमध्ये गेल्यास त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम भागास; जिंती येथे माजी आमदार पाटील यांचे प्रतिपादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी मायनसमध्ये गेल्यास त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम भागास; जिंती येथे माजी आमदार पाटील यांचे प्रतिपादन

करमाळा (प्रतिनिधी): उजनी मायनस मध्ये गेल्यावर त्याचा सर्वाधिक फटका पश्चिम भागास बसत असून या भागातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी जिंती ता. करमाळा येथील सभेत केले. उजनी पाणी परिषदेची आठवी व नववी सभा संयुक्तपणे जिंती ता. करमाळा येथे पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जि प सदस्य शहाजीराजे राजेभोसले यांच्या हस्ते उजनी कलश पुजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जि प सदस्या सौ सवितादेवी राजेभोसले, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धूळाभाऊ कोकरे, रविभाऊ कोकरे, मा उपसभापती दत्ता सरडे, प्रा. संजय चौधरी,प्रा.अर्जून सरक, देशपांडे काका,बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, सुर्यकांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मा आ पाटील म्हणाले की उजनीबाबत ठोस उपाययोजना करताना उजनी पातळी मायनस मध्ये गेल्यावर निर्माण होणाऱ्या समस्यांचाही त्यात समावेश असावा.

उजनीबाबत गाळ, प्रदुषण,अनियमीत पाणीवाटप,शेतीपंपाना मिळणारी अनियमित व खंडीत वीज, पुनर्वसित गावांना दिल्या जाणाऱ्या अठरा नागरी सुविधांचा अभाव आदि महत्त्वाचे विषय आम्ही धरणग्रस्तांचे समोर मांडत आलो आहोत. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना आता या समस्यांची दाहकता जाणू लागली असून पाणी परिषदेत उजनीवरील भविष्यातील उपाययोजना यावर युवक आपली मतं मांडताना पहायला मिळत आहेत. पश्चिम भागातील रस्ते,पाणी, वीज,आरोग्य यावर आपण विकासात्मक ठोस काम करण्यास प्राधान्य दिले होते. पण आज विद्यमान सत्ताधारी मंडळीकडून मात्र या भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असून वीजपुरवठा व ऊसतोड या दोन बाबींवर शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

उजनीवरच तालुक्यातील सहकार अवलंबून असून उजनी टिकून राहीली तरच सहकार टिकेल असे स्पष्ट मत माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. या पाणी परिषदेस विलास कोकणे, डाॅ.प्रशांत पाटील,संजय फडतरे,दादासाहेब मोरे,भीमराव मेरगळ, महादेव पोरे,सुनिल गोडसे मा. (उपसरपंच टाकळी),आजिनाथ लालगे नानासाहेब पवार,झांजूर्णे सर,भीमराव येडे, पोपट करचे,ज्ञानेश्वर दोडमिसे, संतोष पिसे,डॉ. पोटे,वाल्मीक वाघमोडे, गोरख लकडे, राजेंद्र भोसले,आप्पासाहेब जाधव,माऊली भागडे,अरुण फराटे,हनुमंत धायगुडे,डॉ.देवकाते (कावळवाडी),संतोष भोसले महाराज,गणेश खुळे,राजेंद्र कोकरे,तात्यासाहेब पाटील कात्रज,शंकर गुंजाळ,बालाजी वालेकर,सुरेश साळुंखे,चकोर चित्तारे सरपंच टाकळी, येताल शेजाळ,हरिश्चंद्र वारगड,महादेव गिरंजे मा.सरपंच भगतवाडी, पंडीत रणदिवे,किशोर रणदिवे,शेंडगे बापू (कात्रज),सचिन येडे,संतोष केसकर,राजू जाधव, भैरू जाधव भगतवादी,शंकर राऊत केत्तुर, बापूराव कोकने, भैया रणदिवे रामवाडी,कैलास दडस,चंद्रकांत पाडुले (कोंढारचींचोली),देविदास सुतार आदि सह परिसरातील शेकडो धरणग्रस्त सहभागी झाले होते. प्रास्ताविक गणेश घोरपडे यांनी केले. सुत्रसंचलन शाहीर पवार सर यांनी केले. उपस्थितांचे आभार संतोष पिसे यांनी मानले.

litsbros

Comment here