करमाळा

अवकाळी पावसामुळे ऊसतोडीला बसला ब्रेक; करमाळा तालुक्यातही ऊसतोड ठप्प

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अवकाळी पावसामुळे ऊसतोडीला बसला ब्रेक; करमाळा तालुक्यात ही ऊसतोड ठप्प

केतूर (अभय माने): गेल्या दोन दिवसापासून करमाळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सुरळीत सुरू असलेली ऊस तोडणी बंद पडली आहे .उसाच्या शेतात पाणी साचल्याने ऊस तोडणी करणे शक्य नाही तसेच तोडलेल्या उसाची वाहने शेतात चिखल झाल्याने उसाच्या शेतातुन निघणे अवघड झाले आहे.

तर पावसाच्या आधी तोडलेला ऊसही शेतातच पडून राहिला आहे सुरळीत सुरू झालेल्या ऊसतोडणी हंगामाला अवकाळी पावसाने ब्रेक लावण्याचे काम केले आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे, यामुळे अडचणीत मात्र भर पडली आहे. उसाच्या शेतातील पाणी हटल्याशिवाय ऊसतोड करता येणे शक्य नसल्याचे ऊसतोड मजुरांनी सांगितले आहे.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पर जिल्हा तसेच परराज्यातून परिसरात आलेल्या ऊसतोड मजुरांना बसला आहे ऊसतोड मजुरांनी बांधलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने त्यांच्या चुली पेटणे अवघड झाले आहे. त्यातच पावसामुळे त्यांची कपडे अन्नधान्य सर्व भिजून गेले आहे.

litsbros

Comment here