ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यावर भिमजयंती उत्साहात साजरी
करमाळा : प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील खडकी गावच्या शिवारात ऊस तोडणी मजुराच्या शिवारात भिमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ऊसतोडणी मजुर मुकादम भगवान वाहुळे व ऊसवाहतुकदार अरूण नागटिळक यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच बळीराम शिंदे, ग्रामसेविका उंडे , बापुराव मोरे, अनिरूध्द गोडगे, नानासाहेब मोरे , गोकुळ रोडे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भिमजयंती निमित्ताने बुध्दवंदना घेण्यात आली. यावेळी भगवान वाहूळे , जनार्धन सदावर्ते, मारुती मुळे दिवाकर जाधव, बंडू ढाकरके, शिवाजी खरात,
बबन भागडे , कलिंदा वाहूळे, कांताबाई सदावर्ते, सुरेखा मुळे, सागरबाई जाधव ,रुख्मिणी बाई धाकरगे ,सविता खरात , चातुरा भागडे आदि ऊसतोडणी मजुर उपस्थित होते.
यावेळी सर्वांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्वांचे आभार जनार्दन सदावर्ते यांनी मानले.
Comment here