करमाळा

तालुक्यातील पहिला शाळास्तर शाळापूर्व तयारी मेळावा मलवडी येथे धुमधडाक्यात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्यातील पहिला शाळास्तर शाळापूर्व तयारी मेळावा मलवडी येथे धुमधडाक्यात संपन्न

केम(प्रतिनिधी) ; महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर,जि.प.प्रा शिक्षण विभाग सोलापूर आयोजित जि.प.प्रा.शाळा मलवडी येथे शाळास्तर पहिला शाळापूर्व तयारी मेळावा सन २०२२ – २३ मध्ये दाखल पात्र होणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला.मेळाव्याचे उद्घाटन केम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे,माता पालक,शा.व्य.समिती यांच्या हस्ते झाले.गावातून पहिली दाखल पात्र मुले व माता पालक यांची हालगीच्या तालात भव्य प्रभातफेरी घोषणा व मिरवणूक काढली.

मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद पालवे व प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे होते.उपस्थित माता व दाखलपात्र मुलांना मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष मेळाव्यास प्रारंभ झाला.

मुलांचे औक्षण, गुलाब, गोड पदार्थ भरवून स्वागत केले.तदनंतर शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास,गणनपूर्व तयारी , माता पालकांना समुपदेशन व साहित्य वाटप असे शिक्षकांनी तयार केलेले भव्यदिव्य सात स्टाॅल मांडून आलेल्या सर्व मुलांचे कृती कार्यक्रम घेण्यात आले.

शासनाच्या शाळांबाबत योजनांचे देखावे दाखवून मार्गदर्शन केले.मुलांनी, पालकांनी सेल्फी पाॅंईट,गाणी म्हणून ,जेवण करून मेळाव्याचा आनंद लुटला.

या मेळाव्याठी सर्व माता पालक, केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे,भैरु दुरगुळे,शरद पालवे, संतोष कोंडलकर,आबासुरवसे, नितीन बादल, कांतिलाल मेंढे, नितीन दादा पालवे,सुनिल पालवे सर, पप्पू कोंडलकर, भाऊसाहेब सराटे, नितीन जाधव, नागनाथ कोळी, विठ्ठल भोसले, दशरथ मंगवडे, दादा बादल, सुदर्शन सुरवसे, श्रीमती काळे, विजया मत्रे , सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट सदस्या, पालकवर्ग उपस्थित होते.

शाळेतील शिक्षक रंजना पाटेकर,शंकर ननवरे,केशव देवकर, राणी सातव, रेवणनाथ देवकर, अलीम शेख यांनी परिश्रम घेतले.

स्वयंसेवक म्हणून योगिता जाधव,साक्षी बादल, सुनिल पालवे,नवनाथ पवार, विजया मत्रे यांनी काम पाहिले.

litsbros

Comment here