करमाळामनोरंजनसांस्कृतिक

करमाळा शहरात भीमजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम; शिव शाहू फूले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे आयोजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात भीमजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम; शिव शाहू फूले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे आयोजन

करमाळा(प्रतिनिधी): महात्मा फुले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिव फूले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बुद्धिबळ, डान्स स्पर्धा, खेळ पैठणीचा, संगित खूर्ची इ स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष नागेशदादा कांबळे यांनी दिली. 

 11 एप्रिल रोजी बुद्धिबळ स्पर्धा येथील चेस असोसिएशन च्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहेत. उदघाटक मेडिकल असो. चे अध्यक्ष सचिन साखरे यांचे हस्ते ,तसेच जगदिशची यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

12 तारखेला सायं 7 वा महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. उदघाटन सौ प्रज्ञा कांबळे यांच्या हस्ते व तथागत महिला बचत गटाच्या सौजन्याने होणार आहे. 

13 तारखेला भव्य खूल्या डान्स स्पर्धा चे उदघाटन संतोष शेठ गूगळे यांच्या हस्ते डाॅ सौ.कविता कांबळे स्त्री रोग तज्ञ यांचे प्रमुख उपस्थितीत व ब्लू स्टार डान्स अॅकॅडमी यांचे सौजन्याने होणार आहे. 

14 तारखेला भव्य दिव्य मिरवणूकिचे आयोजन करण्यात आले असून संभाजी ब्रिगेडचे पूणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, मा दिपक चंदनशिवे, तसेच यशकल्याणी चे गणेश करे पाटील,ज्ञानदेव खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूकिचा प्रारंभ डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळा येथून होणार आहे. तरि सर्व बहूजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागेशदादा कांबळे यांनी केले आहे. 

शिव शाहू फूले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी लक्ष्मणराव भोसले, दिपक ओहोळ,यशपाल कांबळे प्रसेनजित कांबळे, भिमा कांबळे सर, दत्ता बडेकर रणजित कांबळे, सूहास ओहोळ, भिमराव (बाळू) कांबळे,नामदेव वाघमारे, विजय वाघमारे शरद पवार, सदा कांबळे,सदा कांबळे फकिरा कांबळे, जय कांबळे, अमोल महाडिक,प्रफुल्ल दामोदरे संदिप धाकतोडे इ उत्सव समिती चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

litsbros

Comment here