करमाळा

करमाळा तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू

केतूर (अभय माने): संपूर्ण करमाळा तालुक्यात हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून, बहुतांश ठिकाणचे ढगाळ वातावरण गेल्या दोन दिवसापासून कमी झाले आहे.दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन पडू लागले आहे त्यामुळे उकाड्यात मात्र वाढ झाली आहे. नोव्हेंबर संपत आला तरी काही भागात उन्हाळ्यात ऊन – पावसाचा खेळ रंगत आहे.आणखी काही दिवस असेच वातावरण राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

गेल्या दोन दिवसापासून सकाळी अकरा वाजल्यापासून तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे चटके बसत आहेत त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

करमाळा तालुक्यातील ‘या’ गावचे रेल्वेगेट होणार कायमचे बंद; प्रवास करताय तर लक्षात असुद्या!

सातत्याने निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पाऊस बरसात करत आहे त्यामुळे यंदाच्या हिवाळी हंगाम अपवाद ठरत आहे त्यामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा पेरण्यांना यांना मात्र ब्रेक बसला आहे.

संग्रहित छायाचित्र

litsbros

Comment here