करमाळाराजकारण

गुरुवारी करमाळा बंद; करमाळा तहसीलदारांना दिले निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गुरुवारी करमाळा बंद; करमाळा तहसीलदारांना दिले निवेदन

करमाळा(प्रतिनिधी) ;
ओबीसी (OBC) आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी 10 मार्च करमाळा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत निवेदन तहसीलदार समीर माने यांना ओबीसी (OBC) संघटनेच्या वतीने देण्यात आले.

ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण दोन्ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने ओबीसी समाज्यातील जनतेमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे.

सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी करमाळा शहर दि 10 मार्च गुरुवार रोजी बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. सदर बंद शांततेच्या मार्गाने करण्याचा आमचा मानस आहे.

आपण आमच्या भावना लक्ष्यात घेऊन सहकार्य करावे असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रती करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी, करमाळा पोलीस निरीक्षक निरीक्षक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हमाल पंचायत, मा अध्यक्ष करमाळा तालुका व्यापारी असोशियसन,आदी जणांना दिलेल्या आहेत.

यावेळी शेतकरी नेते दशरथ कांबळे, गणेश चिवटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील, पंचायत समिती सदस्य लकडे, दत्ता अडसूळ, प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जयंत दळवी, सुनिल बनसोडे,

विनोद महानवर, बाळासाहेब कुंभार, सुनील विटकर, बंडू शिंदे, मानसिंग खंडागळे, भैय्या गोसावी, धर्मराज नाळे, गिरिराज गोसावी ज्ञानदेव क्षिरसागर, अंकुश जाधव, किरण बोकन, नारायण पवार, अर्जुन गाडे, राजाभाऊ कदम, बाळासाहेब क्षिरसागर, रामकृष्ण माने, हबीब कबीर, सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here