करमाळाराजकारण

अर्थसंकल्पातील घोषणांचे ग्रामीण भागातून स्वागत

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अर्थसंकल्पातील घोषणांचे ग्रामीण भागातून स्वागत

केत्तूर (अभय माने) : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना कृषी पंपाचे साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या वीजबिल माफ करणे, गाईच्या दूध दरात एक जुलैपासून पाच रुपयाचे अनुदान वाढ करणे, मोफत 3 गॅस सिलेंडर देणे, शिक्षण घेणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देणे, तसेच नवविवाहित मुली व महिलांना मध्य प्रदेश सरकारप्रमाणे माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना 1 हजार 500 रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.या सर्व निर्णयांचे सर्वसामान्य नागरिक शेतकरी तसेच महिला वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.

  ” राज्याचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार झाला आहे. यामध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना लाभ होणार आहे हा अर्थसंकल्प दिशा देणारा ठरणार आहे.”

    – ॲड.अजित विघ्ने – प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस

“अर्थसंकल्पात घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे. या सर्व घोषणांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे आणि तसेच झाले तरच सर्वसामान्य सर्वक्षेत्रातील नागरिक खुषीत राहतील अन्यथा घोडामैदान जवळच आहे.अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.” 

litsbros