करमाळा

करमाळा तालुक्यात सकाळी गारवा तर दुपारी ऊन; उन्हाळ्याची चाहूल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात सकाळी गारवा तर दुपारी ऊन; उन्हाळ्याची चाहूल

केतूर (अभय माने): सध्या सर्वत्र वातावरणातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उजनी पाणलोट परिसरासह करमाळा तालुक्यात गारवा असला तरी दिवसभर मात्र उष्णतेचा अनुभव नागरिकांना मिळत आहे त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे दिसत आहे.

दरम्यान विरोधी (विषम ) वातावरणामुळे रुग्णांमध्ये मात्र वाढ होत आहे . यावर्षी अवकाळी पावसामुळे ‘ऑक्टोबर हीट ” चा तडाखा तालुका वासियांना जाणवला नाही सध्याही सकाळी व पहाटे वातावरणात आल्हाददायक थंड गारवा जाणवत आहे तर दुपारी उन्हाची तीव्रताही वाढत आहे.

वातावरणातील हा बदल अजून काही दिवस असाच राहणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.

litsbros

Comment here