करमाळा

सावडी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सावडी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

सावडी(प्रतिनिधी) ;
सावडी ता.करमाळा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड , माजी ग्रामपंचायत सदस्य आदमभाई शेख, दादा शेलार, डॉ किरण गायकवाड, ईन्नुसभाई शेख,पै.महादेव शेलार, आकाश शेलार, ज्ञानेश्वर गायकवाड,शंकर गायकवाड, दादा शेलार, आरूण रजपूत,अदिरत्न शेलार, विजयकुमार रजपूत,भिमराज शेलार,सुर्या रजपूत उपस्थित होते.

यावेळी बोलताना यशवंत गायकवाड म्हणाले राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी आपल्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेबरोबर , समाजातल्या वाईट रुढी परंपरेबरोबरच ,माणसाची मस्तक साफ करण्याचे ,काम केले त्याचबरोबर शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देत असताना बाबा म्हणायचे ,एक वेळ बायकोला लुगडं कमी किंमतीचे घ्या, परंतु पोरांना शाळा शिकवायचे सोडू नका.

त्यावेळी डॉ किरण गायकवाड, आकाश शेलार, ईन्नुसभाई शेख,भिमराज शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर गायकवाड, दादा सु‌ शेलार, यांनी प्रयत्न केले व आभार प्रदर्शन महादेव शेलार यांनी केले.

litsbros

Comment here