करमाळाशेती - व्यापार

वीज पुरवठा खंडित केल्याने साहेबांना केत्तुर येथील शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अनोखे आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वीज पुरवठा खंडित केल्याने साहेबांना केत्तुर येथील शेतकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अनोखे आंदोलन

केतूर (अभय माने) : महावितरण कंपनीने कोणतीही पुर्व सूचना न देता कृषी पंपाची विज खंडीत केल्याने केत्तूर येथील शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने विद्युत वितरण कंपनीचे पारेवाडी सब स्टेशन चे कनिष्ठ अभियंता निकम साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन आंदोलन केले.

नियमीत पणे विज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडित केल्याने अतोनात नुकसान होत असून याला सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार आहे असे लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी विजय येडे, संजय फडतरे,लक्ष्मीकांत पाटील,आबासाहेब येडे,दादासाहेब कोकणे, बापू राऊत, संदीप राऊत,श्रीकांत जरांडे, अनिकेत मिंड, अक्षय कोकणे,संतोष शेंडगे आदी शेतकरी उपस्थित होते.

litsbros

Comment here