करमाळा

करमाळा तालुक्यातील मांजरगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील मांजरगाव ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

केतूर (अभय माने) ; मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई (रजि.ट्रस्ट ) यांचे वतीने राज्य व राष्ट्रस्तरीय गुणिजन गौरव पुरस्काराचे वितरण शानदार समारंभ पुर्वक दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे संपन्न झाले या मध्ये मांजरगावच्या (ता. करमाळा ) लोकनियुक्त प्रथम थेट सरपंच गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांना प्रतीभा सम्मान अचिव्हर्स अवार्ड २०२२ ,राष्ट्रस्तरीय भारत ज्योती आइडियल लेडी नारी सम्मान अवार्ड 2022 ( भारतज्योती आदर्श महीला पुरस्कार 2022 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर सुप्रसिद्ध विचारवंत ,लेखक, पत्रकार, कवी, वक्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आव्हाड सुप्रसिद्ध साहित्यीक विशेष पाहुण्या मा.डॉ.सौ. महालक्ष्मी वानखेडकर इंटरनॅशनल टॅलेन्ट आयकॉन आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचे हस्ते सन्मान पुर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह ,मेडल, महावस्त्र, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.


यापुर्वी याच ट्रस्टच्या वतीने 24 डिसेंबर 2021 रोजी राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच या पुरस्कारने सौ. कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले होते व राष्ट्रस्तरीय पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले होते या वेळी श्री.मकाई सह.साखर कारखान्याचे संचालक युवानेते मा. संतोषआप्पा पाटील, दिपक झाकणे, सचिन चव्हाण, मा. सरपंच महेशकुमार कुलकर्णी उपस्थीत होते.


ग्रामविकास करत असताना सरपंच पदाला योग्य न्यायदेत गावातील मुलभूत गोष्टीवर काम करून गावाचा विकास घडवुन आणला ग्रामविकासामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

करमाळा माढा न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, सरपंचपदी विराजमान झाल्यापासून आज पर्यंत केलेल्या कामा मधून गावांमधील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला महिला सबलीकरण साठी प्रयत्न केल्याने बचत गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय उभा राहिले.

अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण केल्याने नागरिकांना रस्ते सोयीचे झाले शैक्षणिक बाबतीमध्ये शाळेचा दर्जा उंचावला त्यामुळे लोकांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश यांचा कल वाढला अत्याधुनिक सुविधा दिल्याने मनोरंजनातून शिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पाडताआला ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याने लहान-मोठे चोऱ्यांचे प्रमाण पूर्णपणे घटले स्वच्छता वाढल्याने गावातील रोगराईला आळा बसला.

शुद्ध पिण्याचे पाण्यामुळे पोटाच्या विकारांना किंवा इतर आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी झाले सभामंडपाची उभारणी केल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना व्यासपीठ उपलब्ध झाले शाळेसाठी क्रीडांगण तयार केल्याने मुलांचा व्यायाम होऊन शारीरिक क्षमता वाढीस फायदा झाला प्रत्येक घरी शोष खड्डे दिल्याने स्वच्छता वाढून डासांचा प्रादुर्भाव बंद झाला कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्याने यांत्रिकीकरण सक्षम पणे राबवता आले प्रत्येक शेतकऱ्याकडे अत्याधुनिक अवजारांचा संचय वाढला इ .

माझे गाव आदर्श गाव करणे हेच माझे ध्येय आहे
मुख्य म्हणजे थेट जनतेतुन माझी निवड झाली असुन ग्रामस्थांच्या आपेक्षा पुर्ण करण्याचा काटेकोर प्रयत्न करणे, महिला सबलीकरणावर जास्तीत जास्त भर देणे
प्रत्येक कुटुंबात छोटा-मोठा व्यवसाय उभारणेस मदत करणे, ग्रामस्वच्छतेचा काटेकोर प्रयत्न करणे
शैक्षणिक दर्जा सुधारणे साठी प्रयत्न करणे,
ग्रामस्थांसाठी सर्व मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणे
आदर्श गाव संकल्पना राबवणे,

पारदर्शक कारभार करून गावाचा विकास घडविणे
जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणून गावाचा विकास घडवणे
सर्व सोयींनी युक्त गावाची निर्मिती करणे,
माझ्या स्वप्नातलं सुंदर स्वच्छ आणि समृद्ध गाव निर्माण करणे .हा उद्देश कायम डोळ्यासमोर ठेऊन आज पर्यंत काम केले कामाशी ईमान राखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच फलित म्हणुन हा पुरस्कार मला मिळाला आहे.

गावाच्या विकासासाठी आम्हाला जि.प. चे माजी अध्यक्ष व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी चा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे च मी ग्रामविकास करू शकले. गावाने गेली सलग पाच पंचवार्षिकला दोन सदस्य व दोन वेळा सरपंच पद आमच्या कुटुंबाला दिले याचा मला खुप अभिमान आहे.

हा पुरस्कार आमचे दैवत स्व. लोकनेते साहेबराव (आण्णा) पाटील, आमचे मार्गदर्शक रामेश्वर पाटील युवानेते संतोष आप्पा पाटील तसेच सर्व ग्रामस्थ,सर्व हितचिंतक यांना समर्पित करते.

ग्रामविकास करत असताना आम्हाला ग्रा.पं चे उपसरपंच आबासो चव्हाण ग्रा.पं चे सर्व सदस्य , ग्रामसेवक राहुल कांबळे, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी तसेच मेजर संतोष बागडे, अनेक जेष्ठ मार्गदर्शक मंडळींचे,सर्व ग्रामस्थांचे कायम सहकार्य मिळाले.

यापुढेही असेच काम करत राहुन ग्रामविकास घडवुन आणुन एकदिवस मांजरगाव आदर्श गाव करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

litsbros

Comment here