करमाळा

पांगरे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पांगरे ग्रामपंचायतीतर्फे वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी

करमाळा (प्रतिनिधी):
पांगरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम ग्रामपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजा करून व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विधीवत पूजा करून जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना खाऊ वाटप करून शिवजयंती साजरी केली.

त्यानंतर शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच प्रतिनिधी ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच गणेश वडणे, माजी उपसरपंच सचिन पिसाळ, सदस्य महेश टेकाळे, विवेक पाटील, सचिन गायकवाड, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जोतिराम गाडे पाटील, तुकाराम पिसाळ, महेश शेळके, बापू दोंड, सतीश भगत, भाऊ टेकाळे, बापू पिसाळ, सुशांत वडणे, नाथा काळे, नाथा उघडे,

पोलीस पाटील युवराज सावंत, मनोहर लांडे, पांडुरंग उघडे, त्याचबरोबर ग्रामसेवक समाधान कांबळे, कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे, अंगणवाडी कर्मचारी आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here