माढा

ग्रामपंचायत उपळवटे व जि.प.प्रा.शाळा उपळवटे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामपंचायत उपळवटे व जि.प.प्रा.शाळा उपळवटे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

उपळवटे (प्रतिनिधी) संदीप घोरपडे

माढा तालुक्यातील उपळवटे येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील यांनी केले आहे 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस आहे. अशा या मंगलक्षणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहा चा जन्म झाला तो सिंह म्हणजे शिवाजी राजे भोसले होय.

ते शहाजी राजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांचे महान कार्य होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत नव्हता कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात होती शिवराय लहानपणापासूनंच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धी चे होते.

त्यांना माता जिजाऊंकडुन उत्तम संस्कार व शिकवण मिळाली तर वडील शहाजी राजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला आहे.
यावेळी उपस्थित
उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील उपसरपंच दीपिका महेश देवडकर ग्रामपंचायत सदस्य राहुल घाडगे उपळवटे गावचे पोलीस पाटील भाऊसाहेब गरड पाटील गटनेते जोतीराम देवडकर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष महेश देवडकर जि.प.प्रा.शाळा उपळवटे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे व सर्व शिक्षक स्टाफ

उपळवटे गावचे ग्रामसेवक बनाते भाऊसाहेब संगणक परिचालक अंगद शेळके शिक्षण प्रेमी अशोक कल्याण गरड शिपाई रमेश लोहार तानाजी गायकवाड गुलाब गाडे आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा सेविका इ.सर्वजणया कार्यक्रमासाठी उपस्थित होते शिवजयंती साजरी करण्यासाठी जमलेल्या शाळेतील मुलांना खाऊचे वाटप उपळवटे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

litsbros

Comment here