करमाळामाणुसकी

या वर्षीचे शहीद नवनाथ गात स्मृती पुरस्कार जाहीर; वरकुटे येथे २ मार्चला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा, ‘हे’ आहेत पुरस्कारार्थी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

या वर्षीचे शहीद नवनाथ गात स्मृती पुरस्कार जाहीर; वरकुटे येथे २ मार्चला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सोहळा, ‘हे’ आहेत पुरस्कारार्थी

करमाळा (प्रतिनिधी):
शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीने शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 18 वर्षापासून सामाजिक,शौर्य, शैक्षणिक आणि क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थांना शहीद जवान नवनाथ गात पुरस्काराने गौरवण्यात येते. त्यानुसार यावर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या वर्षीचा” सामाजिक पुरस्कार”:- मराठा फोर्टस, करमाळा यांना तर “शौर्य पुरस्कार” करमाळा विभागातील निर्भया पथक यांना जाहीर करण्यात आलेला आहे.


यंदाचा “क्रीडा पुरस्कार”सहकार महर्षी गणपतराव साठे प्रशाला माढा यांना. तर “शैक्षणिक पुरस्कार”जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड यांना देण्यात येणार आहे.
सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे
या पुरस्काराचे वितरण वरकुटे(मूर्तीचे), तालुका – करमाळा,येथे २ मार्च रोजी समारंभपूर्वक होणार असल्याची माहिती शहीद जवान नवनाथ गाथ स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.


या पुरस्काराच्या वितरण प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध(अण्णा) कांबळे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. अँड. बाबूराव हिरडे. तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका रश्मी बागल, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, लक्ष्मणराव पवार विद्यालयाचे प्राचार्य योगेश दळवी, मा. जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत, मा.सरपंच अजित दादा तळेकर रिपोर्टर शीतलकुमार मोटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहीद जवान नवनाथ गात यांच्या 19 व्या स्मृतिदिनानिमित्त

वरकुटे(मूर्तीचे),तालुका – करमाळा.येथे दिनांक 2 मार्च 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
कारगिल युद्धप्रसंगी वीरमरण पत्करलेल्या शहीद जवान नवनाथ गात यांची स्मृती चिरंतन राहावी त्यांनी केलेल्या त्याग व बलिदानाने आजच्या युवकांना ही स्फूर्ती व प्रेरणा मिळावी म्हणून या परिसरातील युवकांनी शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीची स्थापना केली असून गेल्या एक तपापासून म्हणजे 19 वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.


यामध्ये प्रामुख्याने दरवर्षी भव्य रक्तदान शिबीर, विविध सांस्कृतिक कार्यक्रम ,शालेय स्पर्धांचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केले जाते.या वर्षीही आयोजन केले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन स्मारक समितीच्या वतीने नागनाथ गात आणि नीलकंठ ताकमोगे यांनी केले आहे.

litsbros

Comment here