‘ या रस्त्याने जायचे नाही’ असे म्हणत चौघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण; करमाळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील चिखालठान नं 1 येथील संतोष मच्छिंद्र गव्हाणे (वय 29) यांनी महावीर चोरमले , सतीश चोरमले तसेच शिवाजी चोरमले यांच्या विरुध्द करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संतोष गव्हाणे हे त्यांच्या शेतामध्ये जात असताना, या रस्त्याने जायचे नाही, तू या रस्त्याने का जातोस ? तुला सांगितले होते ना की या रस्त्याने जायचे नाही म्हणून असे म्हणत सतिश चोरमले यांनी संतोष गव्हाणे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केले, ते म्हणाले की, हा रस्ता सरकारी आहे तुम्ही मला अडवू शकत नाही असे म्हणताच महावीर
चोरमले यांनी संतोष यांना लोखंडी रॉडने मारहाण केली तसेच रंजना चोरमले यांनी सुद्धा दगडाने पाठीत मारले. संतोष गव्हाणे यांना सोडवण्यासाठी गेलेल्या सुरेश गव्हाणे, राहीबई गव्हाणे, सारिका गव्हाणे यांना सुद्धा दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली.
या चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Comment here